Gold Silver Rate :
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर देशभरातील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याची पहायला मिळाली. दिल्ली बरोबरच देशभरात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. आजच्या या पोस्टमध्ये देशभरात कोणत्या शहरात सोन्याचे किती भाव आहेत आपण जाणून घेणार आहोत.
Gold Silver Rate केंद्रीय अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली, त्यामुळे देशभरामध्ये सोने आणि चांदी यांच्या भावामध्ये बदल झाले आहेत. सर्वच शहरांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये घसरण झाली आहे.
गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर तब्बल 7269 रुपयांनी घसरले आहेत. सोन्याच्या दरातील घसरण पुढे काही दिवस चालू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सोने-चांदी मार्केट वर खूप मोठा परिणाम झाला आहे. तर आता आपण कोणत्या शहरांमध्ये सोन्याची रेट Gold Silver Rate किती आहेत हे जाणून घेऊया
Table of Contents
Gold Silver Rate दिल्ली :
Gold Silver Rate दिल्ली ही भारत देशाची राजधानी आहे त्यामुळे दिल्लीतील सोन्याच्या भावाकडे सर्व देशाचे लक्ष आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर दिल्लीमधील सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा म्हणजेच प्रति दहा ग्रॅम 64 हजार दोनशे रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 67 हजार 410 रुपये एवढा झाला आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने लोक सोने खरेदी करत आहेत.
Gold Silver Rate मुंबई :
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांमध्ये सोन्याचे दर घसरले आहेत. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्राम चा भाव 68 हजार 131 रुपये होता तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 62 हजार 408 रुपये आहे.
Gold Silver Rate चेन्नई :
चेन्नई मध्ये देखील सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे, चेन्नई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम ला 64 हजार 140 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम ला 69 हजार 970 रुपये आहे.
Gold Silver Rate सातारा :
सातारा या ठिकाणी देखील सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये घसरण झाल्याची पाहायला मिळते सातारा या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 63 हजार 140 रुपये आहेत, तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम68 हजार 870 रुपये आहे.
Gold Silver Rate पुणे :
पुणे ही देशाची संस्कृती राजधानी आहे. देशभरातील सोने चांदीच्या भावाबरोबरच पुण्याच्या सोन्याच्या भावात देखील मोठा बदल झाला आहे. पुणे शहरात 22 कॅरेट सोन्याचा प्रतिदहा ग्रॅम भाव 62 हजार रुपये आहेहजार रुपये आहे. तर पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 68 हजार 131 रुपये आहे आपण जर पाहिलं तर पुणे आणि मुंबई या सोन्याच्या भावामध्ये तफावत नाहीये.
सोन्याच्या भावाबरोबरच चांदीच्या भावामध्ये देखील घसरण झाली आहे सध्याचा महाराष्ट्रातील चांदीचा रेट हा 81271 रुपये प्रति किलो एवढा आहे. याआधी सोनबहात्तर हजाराच्या जवळपास होतं मात्र कस्टम ड्युटी कमी झाल्याने सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे बोलले जात आहे. आर्थिक सल्लागार आणि तज्ञांच्या मते जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडे थोडे करून सोने खरेदी केले पाहिजे. कारण पुढचे काही दिवस सोन्या-चांदीच्या दरामध्ये घसरण होत राहील त्यामुळे एकदम गुंतवणूक करू नये. परंतु अचानक दर वाढू देखील शकतात त्यामुळे थोडे थोडे करून सोने खरेदी करू शकता.
दरम्यान सध्या तरी सोन्याचे दर कमी होत चालले आहेत आणि अजून काही दिवस हे दर कमी होत जातील असं तज्ञांकडून मत व्यक्त केलं जात आहे.
सोन्यात गुंतवणूक करणे रिस्की आहे का
बरेच जण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात. तसं पाहिलं गुंतवणूक करण्यासाठी सोने चांदी हा एक बेस्ट पर्याय आहे. सध्या सोने-चांदीचे दर देखील कमी झालेले आहेत आता सोन्यामध्ये थोडीफार गुंतवणूक करायला हरकत नाही. जेव्हा सोन्याचा अवरेज रेट कमी होतो त्यावेळेस नक्कीच सोन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
आजची मार्केट परिस्थिती लक्षात घेता थोडे थोडे करून सोने खरेदी केले पाहिजे. तज्ञांच्या मतानुसार अजून पुढचे काही दिवस सोन्याच्या दरामध्ये थोडीफार घसरण होत राहील तोपर्यंत आपण सोने खरेदी करत राहावे. 2024 च्या अर्थसंकल्पीय बजेट मुळे सोने चांदीच्या भावावर हा परिणाम झाला आहे. तर मित्रांनो सोने चांदी मध्ये गुंतवणूक करणे जास्त रिस्की नाहीये आपण सोने आणि चांदी यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
सोन्याचे दर का वाढतात ?
- जेव्हा मध्यवर्ती बँका राखीव म्हणून मोठ्या प्रमाणात सोने चांदी खरेदी करतात तेव्हा चलनाचा पुरवठा वाढल्याने आणि सोन्याची उपलब्धता कमी झाल्याने सोन्याच्या किमती वाढतात.
- चीन आणि भारत देशामध्ये सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. औद्योगिक वापरातूनही सोन्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दरामध्ये वाढ होत असते.
- जेव्हा लोक सरकार किंवा वित्तीय बाजाराबद्दल निश्चित असतात तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात.
- गुंतवणूकदारांना चलनाचे मूल्य घसरण्याची भीती असताना गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करतो म्हणून सोन्याचे भाव वाढतात.
- जेव्हा डॉलर कमजोर होतात तेव्हा सोन्याचे भाव वाढतात.
- जेव्हा आर्थिक परिस्थिती सोन्याला अधिक आकर्षक बनवते तेव्हा देखील सोन्याच्या भावामध्ये वाढ होते
गुंतवणुकीची सुवर्णसंधी
सोने ही एक उत्कृष्ट गुंतवणूक आहे सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये काही जादुई गुणधर्म आहेत जे त्याला सर्वात जास्त चाचणीच्या काळात तरंगत राहण्यास मदत करतात सोन्याला गुंतवणुकीचे उत्कृष्ट साधन बनवणारे काही मुद्दे आहेत.
- महागाईपासून संरक्षण : आहे आणि आपण कितीही कठोर किंवा हुशारीने काम केले तरी त्यातून आपल्याला सुटका मिळत नाही. सोन हे एक कदाचित एकमेव असा घटक आहे जे त्याचे मूल्य टिकून ठेवते आणि महागाईपासून संरक्षण करते. सोन्याचे मूल्य राहणीमानाच्या किमतीसह वाढते आणि उच्च चलनवाढीच्या काळात त्याच्या सर्वोच्च मूल्य पर्यंत पोहोचते.
- विविधिकरण : असणे आवश्यक आहे कारण ते जोखीम संतुलित करण्यात मदत करते सोन्याचे मूल्य हे स्टॉक सारख्या पारंपारिक आर्थिक गुंतवणुकीच्या व्यस्त प्रमाणात असल्यामुळे बाजारातील अस्थिरतेच्या विरोधात सुरक्षितता जाळे म्हणून काम करू शकते.
- मागणी आणि पुरवठा : सोने हे नैसर्गिक स्त्रोत असल्याने ते संपुष्टात येत नाही याचाच अर्थ मौल्यवान धातूचा मर्यादित पुरवठा असतो आणि मर्यादित पुरवठा असलेल्या धातूंना नेहमी मागणी असते परिणामी त्याचे मूल्य कमी होत नाही. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे एक आपल्यासाठी सुवर्णसंधी असते. आजपर्यंतचा संपूर्ण इतिहास जर आपण अभ्यासला तर लॉन्ग टाइम साठी विचार केल्यास सोन्याच्या दरामध्ये वाढच होत गेलेली आहे.
- आणि भविष्यातही सोन्याच्या दरामध्ये वाढच होणार. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता 2024 च्या अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरामध्ये थोडेफार बदल झाले आहेत. सद्यस्थितीत सोन्याचे दर कमी झालेले आहेत आत्ताच आपण गुंतवणूक करू शकता. पुढील काही दिवस हे दर असेचकमी होत जातील असे देखील अर्थतज्ञ म्हणत आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण लॉन्ग टाइम चा विचार करत असाल तर सोन्याचे दर वाढतच राहणार आहे कारण सोनं हा एक मौल्यवान धातू आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हा धातू आपल्याजवळ असावा वाटतो त्यामुळे मागणी वाढते आणि सोन्याच्या दरात वाढ होते. म्हणून असं म्हटलं जातं की सोन्यामध्ये गुंतवणूक ही एक सुवर्णसंधी आहे.
पुणे आणि इतर शहरांमध्ये सोन्याच्या दरात नेहमी फरक का असतो?
भारत देशातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या विविध किमती असतात. परंतु एक गोष्ट जर आपण अभ्यासली तर कोणत्याही शहरातील सोन्याची तुलना केली तर त्यांच्या दरामध्ये फार जास्त तफावत नसते. परंतु पुणे शहराच्या सोन्याच्या दराबाबत जर विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की पुण्यातील दर हे वेगळे असतात.
मार्जिन : पुण्यातील सोने व्यापारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून सोन्याच्या आयात किमतीवर मार्जिन आकारू शकतात हे मार्जिन बदल असल्याने इतर भारतीय शहरांपेक्षा पुण्यात सोन्याचा भाव वेगळा असतो.
आयात : कोणत्याही वस्तूचे आयातीचे मूल्य हे त्याच्या दरावर परिणाम करत असतात. सोन्याचे आयातीचे मूल्य हे त्याच्या दरावर परिणाम करणारा घटक आहे. सोन्याच्या मागणीनुसार पुण्यात आयात केली जाते जी इतर शहरांपेक्षा वेगळी असते. बाकी शहरांच्या तुलनेत पुण्यामध्ये सोन्याची मागणी जास्त आहे. पुणे हे सांस्कृतिक शहर असल्यामुळे देशभरातील लोक पुण्यामध्ये राहणं पसंत करतात. आणि पुण्यामध्येच खरेदी करतात त्यामुळे पुण्यामध्ये सोन्याची मागणी जास्त आहे. ज्यामुळे पुणे आणि इतर शहरातील सोन्याच्या दरामध्ये बदल जाणवतात.