Ladki Bahin Yojana Scheme :
Ladki Bahin Yojana Scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. महिलांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा झाली. आता या योजनेचे दोन हप्ते म्हणजेच 3 हजार रुपये महिलांच्या थेट अकाउंट मध्ये जमा होणार आहेत. आजच्या पोस्टमध्ये कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा होणार हे आपण जाणून घेऊया.
राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. महिलांसाठी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी . राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे,त्यांच्या सशक्ति करण्यास चालना देणे या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना 1 जुलैपासून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. आणि 19 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे म्हणजेच 3 हजार रुपये जमा होणार आहेत. राज्यातील दीड कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Table of Contents
अंगणवाडी सेविकांची मदत
महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे सरकारकडून युद्ध पातळीवर माझी लाडकी बहीण योजनेचे कामकाज सुरू आहे. या योजनेचे पहिले दोन हप्ते रक्षाबंधनच्या दिवशी दिले जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे. राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्यासाठी महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. आता या योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी व फॉर्म भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि महिला व बालकल्याण विभाग या माध्यमातून योजनेची अर्ज जमा केले जात आहेत.
ज्या कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा उत्पादन कमी आहे अशा कुटुंबातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. अन्य कुठल्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला या योजनेचा लाभ शकणार नाहीत. फक्त कोणत्याही योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिला व इतर योजनेतून पंधराशे पेक्षा कमी रक्कम चा लाभ घेणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
योजनेचे उद्दिष्ट
Ladki Bahin Yojana Scheme मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत.
- महिलांना आर्थिक साक्षर बनवणे.
- महिलांना आर्थिक मदत करणे.
- महिला सक्षमीकरणासाठी बळकटीकरण देणे.
- निराधार महिलांना आधार देणे.
- कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करणे.
- गरीब कुटुंबातील महिलांचे आरोग्य व राहणीमान उंचावणे.
- महिलांना स्वावलंबनास प्रोत्साहन देणे, इत्यादी या योजनेचे उद्दिष्ट आहेत.
दरमहा 1500 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. राज्य सरकारमधील महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना लागू करण्यात आली आहे. 2024 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेची घोषणा केली. त्या योजनेची अंमलबजावणी करत असताना राज्य सरकारच्या विविध विभागाकडे असलेल्या जुन्या योजनांचा डाटा देखील घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला इतर योजनेतील लाभार्थी महिलांची देखील माहिती मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana Scheme योजनेची वैशिष्ट्ये व पात्रता
- वयोगट : 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत.
- लाभार्थ्यांचे प्रकार : या योजनेचा लाभ पुढील महिलांसाठी असणार आहे. विवाहित महिला, अविवाहित महिला, घटस्फोटीत,, परितक्या निराधार, विधवा या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
- अर्ज प्रक्रिया : या योजनेची अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत लाखो महिलांनी अर्ज दाखल केले आहेत.
- अंमलबजावणी : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी मिशन मोडवर राबवली आहे.
अर्ज प्रक्रिया व अंमलबजावणी
- अर्जदाराने राज्य शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावयाचा आहे. या योजनेचा अर्ज तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून देखील होऊ शकतात जर तुम्हाला. कॉम्प्युटर किंवा मोबाईल वरून स्वतः अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन केंद्रावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या योजनेसाठी पात्र महिलांची यादी जाहीर होईल.
- अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील
- या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जाणार आहे.
Ladki Bahin Yojana Scheme योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड.
- अधिवास प्रमाणपत्र ( लागू असल्यास )
- जन्म प्रमाणपत्र.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड.
- बँक पासबुक आणि फोटो, इत्यादी कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहेत.
Ladki Bahin Yojana Scheme योजनेचे महत्त्व
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करणे, या योजनेमुळे महिलांना उत्पन्नाचा एक स्रोत मिळेल आणि ज्यामुळे त्या आर्थिक दृष्ट्या परिपक्व होतील.
- कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ : Ladki Bahin Yojana Scheme या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणार आहे, या योजनेमुळे कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे महिला सशक्तिकरणास मदत मिळेल व महिलांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
- Ladki Bahin Yojana Scheme या योजनेमुळे महिलांना स्वावलंबनास प्रोत्साहन मिळेल नियमित मिळणाऱ्या उत्पन्नामुळे महिला छोटे-छोटे व्यवसाय करू शकतील. महिला या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक लाभाच्या जोरावर स्वतःच्या कौशल्य विकासावर भर देण्यात प्रोत्साहित होतील.
लाडकी बहीण योजनेसाठी गर्दी
राज्य सरकारने Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर प्रचंड गर्दी जमण्यास सुरुवात झाली. नोटबंदीच्या वेळी जशा बँकांसमोर रांगा होत्या अगदी तशाच आता ऑनलाईन केंद्रावर रांगा पाहायला मिळत आहेत.
मुख्यमंत्री माजी लाडकी पहिली योजनेसाठी बँक अकाउंट ची गरज असल्यामुळे महिला आता नवीन खाते उघडण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करत आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ऑनलाइन केंद्राच्या माध्यमातून एप्लीकेशन फॉर्म भरले जात असल्यामुळे ऑनलाईन केंद्रावर गर्दी झाली आहे
आजपर्यंत या योजनेच्या अंतर्गत पुण्यामध्ये तीन लाखाहून अधिक फॉर्म सबमिट झाले आहेत. सुरू झाल्यापासून या योजनेची जोरदार चर्चा आहे. महिला वर्गाने या योजना साठी कंबर कसल्याच दिसून येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांसाठी त्यांची धावपळ उडाली आहे. सकाळी बँक उघडण्यापूर्वीच महिलांचा बँकेसमोर रांगा करत आहेत.
Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी बजेट सादर करताना या योजनेचे महत्त्व सांगितले. काही जिल्ह्यांमध्ये तर बँकांसमोर पहाटे सहा वाजल्यापासूनच रांगा सुरू होत आहे.
रक्षाबंधनला दोन हप्ते
Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच दिवसात या योजनेची पहिली यादी जाहीर होईल आणि त्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी पहिला किंवा एकाच वेळी दोन हप्ते थेट महिलांच्या बँक खात्यावर जमा केले जातील.
ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितला आहे. फक्त विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत म्हणून ही योजना लागू केली विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे. यावर बोलत असताना मंत्री विजयकुमार गावित यांनी स्पष्टीकरण दिलं. राज्य सरकारने महिलांसाठी ही एक चांगली योजना राबवली असून या योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावे असं सरकारकडून आव्हान केलं जात आहे.
अर्जाची पडताळणी अशी करा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी मिशन मोडवर करण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. या योजनेतील अर्जाच्या पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी शिक्षिका, ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळा यामध्ये प्रशिक्षण केंद्र भरवले जात आहेत.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या योजनेचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेत आहेत. विधानसभा निवडणुका लक्षात घेता या योजनेची अंमलबजावणी तातडीने करणे गरजेचे असल्यामुळे राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांवर वाच ठेवला जात आहे. ही योजना करण्यासाठी व नोंदणीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारकडून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत
निष्कर्ष :
2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लागू केलेली ही योजना महिलांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत तर मिळेलच, याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी मदत होईल व महिलांचे जीवनमान देखील उंचावेल . महिलांना आर्थिक साह्य मिळावा या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana सुरू केली. आणि आज या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार अग्रेसिव आहे.