Ujani Dam : आज आपण उजनी धरणात किती पाणी आहे व उजनी उजनी धरण उपयुक्त पातळीत येण्यासाठी किती टीएमसी बाकी आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. वीस पैकी 19 धरणात 40.66 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यापैकी मुळशी 8.29, पानशेत 5.89 टीएमसी, वरसगाव 5.35 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. तर भीमा कोरियातील Ujani Dam उजनी धरणात वजा 12 टीएमसी पाणीसाठा आहे.
मीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये 23 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामध्ये वीर 4.69, भाटघर 11.04 टीएमसी आणि गुंजवणी धरणात 2.3 टीएमसी उपयुक्त पाणी साठा जमा झाला आहे. भीमा खोऱ्यातील परिसरामध्ये सतत मुसळधार पाऊस झाल्याने कळमोडी धरण 100% पूर्ण भरण्याची बातमी समोर आली आहे. आता कळमोडी धरणातून 2000 क्युसेक विसर्ग पाणी नदीत सोडण्यात आले आहे. Ujani Dam
पुण्याजवळील खडकवासला धरण देखील 100% भरत आले आहे. वडिवळे धरण देखील 100% भरण्याच्या मार्गावर आहे. दौंड विसरत मोठी वाढ होऊन 8516 क्युसेक विसर्ग आता उजनी धरणात मिसळत आहे त्यामुळे Ujani Dam उजनी धरणाचा जलाशय देखील आता हळूहळू वाढत आहे. याबरोबरच बंड गार्डन येथून ४३६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी वजा 22.96% झाले आहे. उजनी धरणाला मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी अजून बारा टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या उजनी धरण उपयुक्त पातळीत येण्यासाठी वजा12टीएमसी पाण्याची गरज आहे.
Ujani Dam उजनी धरणाच्या वर असलेली सर्व धरणे भरत आल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होत आहे. खडकवासला, बंडगार्डन येथून मोठा पाण्याचा विसर्ग येत आहे.
Ujani Dam उजनी परिसरात 248 मिलिमीटर पावसाची नोंद
मागच्या वर्षी 21 जुलै रोजी वजा 32.43% पाणी पातळी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उजनी धरणात नऊ टक्के अधिक पाणी पातळी वाढली आहे. मागच्या वर्षी एक ऑगस्ट 2023 रोजी उजनी धरण मृत जलाशयातून बाहेर आले होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी उजनी धरण मृतसाठ्यातून कधी बाहेर येतंय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात 248 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने उजनी धरणाच्या जलाशयात वाढ होईल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी शेतकरी शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणाकडे आस लावून बसला आहे. वरच्या भागातून येत असलेल्या विसर्गामुळे उजनी धरण लवकरच मृत साठ्यातून बाहेर निघेल.
Ujani Dam शेतकऱ्यांची चिंता दूर उजनी प्लसमध्ये
उजनी धरण आता प्लस मध्ये आले आहे . मागील चार दिवसापासून पुणे जिल्हा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणे परिसरातील जवळपास सर्व धरण भरली आहेत . आता पुण्यातील धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या पावसामुळे आणि विसर्गामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी धरण प्लस मध्ये आल्याने सोलापूर आणि पुणे भागातील शेतकरी सुखावला आहे. आज सकाळी उजनी धरणाने 0 पातळी ओलांडली आहे. धरण हे वजा 12 टीएमसी भरलेलं होतं. आज सकाळी उजनी धरण प्लस मध्ये आल आहे.
लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी येणार ?
पुणे भागात होत असलेला सततचा मुसळधार पाऊस आणि उजनीच्या वर असलेले सर्व तलाव व धरणे भरल्यामुळे पाण्याच्या विसरतात वाढ झाली आहे परिणामी उर्जनी धरण प्लस मध्ये आल आहे.
उजनी धरणात १,६०,००० क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरु
यावर्षी उजनी धरण मृतसाठा मध्ये गेले होते. मागच्या आठवड्यात उजनी धरण हे वजाबाकी टीएमसी एवढे भरलेले होते. म्हणजेच उजनी धरण प्लस मध्ये येण्यासाठी बारा टीएमसी पाण्याची गरज होती. आठवड्याभरात पुणे परिसर मध्ये होत असलेल्या पावसामुळे पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे, हे सर्व पाणी उजनी धरणात येऊन मिळत आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आणि अखेर उजनी धरण आता प्लस मध्ये आले आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाप्रमाणे जर पुढील आठवड्यात पाऊस राहिला तर उजनी धरण 100% भरू शकत. कारण सध्या धरणात एक लाख साठ हजार क्युसेक्स ने पाणी सोडण्यात आले आहे. पुणे भागात वाढत असलेल्या पावसाच्या प्रमाणामुळे निसर्गामध्ये वाढ होत आहे. उजनी धरणात येणारा विसर्ग उद्या संध्याकाळपर्यंत दोन लाख क्युसेक्स पर्यंत जाऊ शकतो.
यावर्षी उजनी धरण 100 टक्के भरणार
पावसाळ्याच्या सुरुवातीला मृतसाठ्यात असलेलं उजनी धरण आता प्लस मध्ये आलं आहे. काल सकाळी उजनी धरणामध्ये शून्य पाणी पातळी होती. उद्या संध्याकाळपर्यंत उजनी धरण 25 टक्के भरणार असल्याचे बोलले जात आहे. उजनी धरणात प्रचंड मोठा पाण्याचा विसर्ग जमा होत आहे. जर पुढील आठवड्यात असाच पाऊस राहिला तर आठवड्याभरातच उजनी धरण 100 टक्के भरेल.
सध्या पुणे लोणावळा भीमाशंकर या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे या भागातील नद्यांना पूर आले आहेत. मुळा, मुठा, इंद्रायणी, भीमा या पुण्यातील नद्यातून मोठा पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहे. लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण १४००० क्युसेक्स ,मुळशी ११००क्युसेक्स , चासकमान ६००० क्युसेक्स , कासारसाई १६०० क्युसेक्स व पवना २००० क्युसेक्स, भीमाशंकर परिसरातील पावसामुळे वाडीवाले धरण यातून २२२१ क्युसेक्स विसार्गाने पाणी सोडले जात आहे.